शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0
64

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर सोमवारी सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे.

न्या. सूर्य कांत, न्या. दीपंकर दत्त आणि न्या. के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. अजित पवार गट पक्षादेश जारी करण्याची शक्यता असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची विनंती शुक्रवारी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य केली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घडय़ाळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल करण्याचा निर्णय दिला होता. तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला होता.