शरद गायकवाड अपघात प्रकरणी एकास अटक

0
24

हिंजवडी, दि. 9 (प्रतिनिधी)
पिंपरी, दि.९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील मध्यम प्रतिनिधी शरद वसंत गायकवाड (वय 41) यांचा मुंबई – बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथे अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे. हा अपघात रविवारी (दि. 7) रात्री पावणे दहा वाजता घडला.

ट्रक चालक सादिक इस्माईल बाशा (वय 43, रा. तामिळनाडू) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शरद गायकवाड यांच्या बहिणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद गायकवाड हे त्यांच्या बहिणीला घरी आणण्यासाठी ताथवडे येथे गेले होते. मुंबई-बेंगलोर महामार्गावर डीकॅथलॉन समोर रस्ता ओलांडत असतना भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात शरद गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.