वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांवर गुन्हा

192

वाकड, दि. १८ (पीसीबी) – वाकड येथे पोलिसांनी एका स्पा सेंटरवर वेश्या व्यवसाय प्रकरणी छापा मारून कारवाई केली. त्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. १६) सायंकाळी शंकर कलाटे नगर मधील प्रेस्टीन स्क्वेअर मॉल येथे करण्यात आली.

निखिल जयवंत जाधव (वय २६, रा. पिंपळे सौदागर), रॉबिन अब्राहम (वय ३५, रा. वाकड) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेस्टीन स्क्वेअर मॉल मधील द सेरेने स्पा या स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यात दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. आरोपींनी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. या कारवाईत पोलिसांनी १० हजार ३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.