वृद्धाश्रमासाठी जागा बघून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

0
34

वृद्धाश्रमासाठी जागा बघून देतो, असे सांगून पैसे घेतले. मात्र, नंतर जागेचा व्यवहार पूर्ण न करता समाजसेवक महिलेची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते ८ जून २०२४ या कालावधीत
चिखली – जाधववाडी येथे घडला.

वानवडी येथील समाजसेविकेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रांत बहल (रा. बिहारी कॉलनी, दिल्ली, मूळ – इटावा, उत्तरप्रदेश ) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून वृद्धाश्रमासाठी जागा बघून देतो, असे सांगितले. औंध येथे जागा असल्याचे सांगून त्यांसाठी टोकन अमाउंट म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेतले. मात्र, व्यवहार पूर्ण न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. तसेच फिर्यादीने दिलेले पैसे मागितले असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. फौजदार मुळीक तपास करीत आहेत.