वृद्धाच्या खिशातून दोन आयफोन पळवले

79

चिंचवडगाव, दि. २४ (पीसीबी) – गणपती पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या खिशातून दोन आयफोन पळवले. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सकाळी चापेकर चौक भाजी मंडई, चिंचवड येथे घडली.

संजय रमनलाल देवदास (वय 60, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी 23 सप्टेंबर रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता गणपती पूजेचे सामान खरेदी करण्यासाठी गेले होते. पूजेचे साहित्य खरेदी करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातून 95 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.