वृक्षदायी संस्थेतर्फे ८ एप्रिल रोजी देहूत अर्जून वृक्षाची लागवड

0
135

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – स्वदेशी वृक्षांचा सांभाळ करणारी संस्था वृक्षदायी प्रतिष्ठांनच्या मार्फत सोमवारी ८ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता श्री क्षेत्र भांडारा डोंगराच्या पायथ्याला येलवडी येथील बैलगाडा घाटाजवळील गायरान जमिनीत अर्जून वृक्षाचे रोपन अगदी समारंभ पूर्वक कऱण्यात येणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार हे या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तृतीयपंथातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, देशातील पहिल्या तृतीयपंथी प्रशासकिय शिक्षिका रिया आळवेकर आणि तृतीयपंथी प्रथम सरपंच माऊली कांबळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

पर्यावरणावर काम करणाऱ्या वृक्षदायी प्रतिष्ठानतर्फे आद्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येते. वक्षदायी संस्थेच्या या उपक्रमात सर्व वृक्षमित्रांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.