वीज डीपी मधून 40 हजाराची तांब्याचे तार चोरीला

0
46

चिंबळी येथील एका वीज डीपी मधील चाळीस हजार रुपयांचे तांब्याची तार चोरून तेथील ऑइल सांडून चोरट्याने नुकसान केले आहे हे घटना 8 ते 9 मे 2024 या कालावधीत चिंबळी खेड येथे घडली.

याप्रकरणी गणेश बजरंग गायकवाड (वय 31 रा दिघी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंबळी येथील लोखंडे वस्ती जवळील असलेल्या विद्युत डीपी मधील 40 हजार रुपयांची तांब्याचे तार चोरून नेत, डीपी मधील ऑइल जमिनीवर सांडून डीपीचे नुकसान केले आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.