विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न

0
83

भरधाव वेगाने मोटार चालवून दोन जणांना चिरडल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अग्रवाल याला पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतल्यानंतर आज कोर्टात (दिं. २२) रोजी हजर करण्यात आले. दरम्यान, कोर्टात पोहोचतात विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला. विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅन वरतीही शाही फेकण्यात आली. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

रविवारी मध्यरात्री पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणी नगर येथे आलिशान पोर्श कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्टा या दोन आयटी अभियंतांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये विशाल अगरवाल यांचा सतरा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला मद्यपार्टी करण्यासाठी परवानगी दिल्याप्रकरणी आणि आलिशान पोर्श कार त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना देखील चालवायला दिल्याप्रकरणी विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरुवातीला या प्रकरणांमध्ये ३०४ (अ) हे कलम लावण्यात आले होते. मात्र, नागरिकांमधून निर्माण झालेला संताप माध्यमांमध्ये उठलेली टिकेची जोड पाहता पोलिसांनी ३०४ हे कलम आरोपीवर लावले. नवीन वाहतूक कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना गाडीतील चालवायला दिल्यास त्याच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल केला जातो. अगरवाल याच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही अशी विचारणा समाज माध्यमातून नागरिकांकडून केली जाऊ लागली होती. त्यानंतर पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, ब्लॅक हॉटेलचे व्यवस्थापक आणि कर्मचारी तसेच कोझिज हॉटेलचे मालक आणि कर्मचारी यांच्यावर देखील अल्पवयीन मुलांना मद्य दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यासोबतच राज्य उत्पादन शुल्कने या ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी करून अल्पवयीन मुलांना मद्य पुरवले जात असल्याचे उत्पन्न केले आणि या संदर्भात दोन्ही हॉटेल विरोधात आरोप पत्र देखील दाखल केले.

भरधाव वेगाने मोटार चालवून दोन जणांना चिरडल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 3,5, 199 (अ) प्रमाणे अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास देणे गुन्हा असल्याने पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज (दि.२२) रोजी आरोपी विशाल अग्रवाल यांना पुण्यातील न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले त्यावेळी त्यांच्यावर वंदे मातरम संघटनेकडून शाईफेक करण्यात आली.