विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

108

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – सासरच्या लोकांनी विवाहितेला त्रास दिला. पतीने तिच्याशी तलाक घेतला. तसेच तिच्यावर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला. याबाबत 27 वर्षीय पीडित विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 8 फेब्रुवारी 2020 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत पिंपरी परिसरात घडला. याबाबत ३१ वर्षीय पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपी पतीने फिर्यादींसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीस त्रास देऊन त्यांना तलाक दिला. फिर्यादी यांच्या आई वडिलांना देखील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.