विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

152

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ जुलै २०२१ ते ८ जून २०२२ या कालावधीत केशवनगर चिंचवड येथे घडला.

पती रवींद्र कणसे (वय २५), सासू लतिका रवींद्र कणसे, नणंद राजेश्री योगेश पवार (तिघे रा. चिंचवड), अश्विनी पाटील (रा. सातारा), कल्याणी सागर ढाणे (रा. रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मिळून फिर्यादीस ‘तुला स्वयंपाक येत नाही. तुला फक्त खायलाच लागते’ असे म्हणून घालून पाडून टोचून बोलून मारहाण केली. फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.