विवाहितेच्‍या आत्‍महत्‍या प्रकरणी गुन्‍हा दाखल

0
274

विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करून तिला आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त केल्‍याप्रकरणी एकावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना लालटोपीनगर, पिंपरी येथे ५ जून रोजी घडली.

पूजा लक्ष्‍मण वाघमारे (वय २१) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विवाहितेचे नाव आहे. लक्ष्‍मण कैलास वाघमारे (वय २१, रा. लालटोपीनगर, पिंपरी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत मयत मुलीच्‍या आईने शुक्रवारी (दि. ७) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही झाटना १५ जानेवारी २०२२ ते ५ जून २०२४ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांच्‍या मुलीने आरोपी लक्ष्‍मण याच्‍यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. तेव्‍हापासून आरोपी पती हा फिर्यादी यांच्‍या मुलीला दारू पिण्‍यासाठी माहेराहून पैसे आण म्‍हणून तिचा शाररिक व मानसिक छळ करीत होता. या त्रासाला कंटाळून तिने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली