विवाहितेचा छळ आणि बलात्कार..

0
530

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 जुलै 2021 ते 9 जून 2022 या कालावधीत सासवड आणि चिंचवड येथे घडला.याबाबत 22 वर्षीय विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती (वय 26), सासू (वय 45), सासरे (वय 56), नणंद (वय 25) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या लग्नात तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांचा मानपान केला नाही, सोनेणाने दिले नाही असे म्हणत विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. पतीने देखील त्याच्या घरच्यांचे ऐकून विवाहितेला मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादिवर अनैसर्गिक अत्याचार केले. सासरे यांनी पतीला फिर्यादीबद्दल उलटसुलट सांगून भडकावले असल्याचे फिडयादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.