विनापरवाना जनावरांची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

0
142

चाकण, दि. २५ (पीसीबी) -जनावरे वाहतूक करण्याचा कोणताही परवाना न घेता त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) आंबेठाण चौक, चाकण येथे करण्यात आली.

सय्यद साजिद अली अकबर अली (वय 42, रा. निगडी), सादिक गफर वेपारी (वय 52, रा. जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष फटांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील एका वाहनातून चार वाहनांची दाटीवाटीने कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न करता तसेच जनावरे वाहतूक करण्याचा परवाना न घेता जनावरांची वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.