विनाकारण मारहाण करत तरुणावर कोयत्याने वार

0
299

चिंचवड, दि. 2 (पीसीबी) –  कोणतेही कारण नसताना तीन जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 31) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दत्तनगर चिंचवड येथे घडली.

रुपेश राजेंद्र दनाने (वय 24, रा. शंकर नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अवि पवार (वय 21), स्वप्निल शोभाजी कांबळे (वय 22), सागर सुभाष शिंदे (वय 22, रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी काहीही कारण नसताना फिर्यादी रुपेश यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अवि पवार याने रुपेश यांना कोयत्याने मारले. मात्र रुपेश यांनी कोयता हाताने धरला असता त्यांच्या दोन्ही हाताला दुखापत झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.