विनाकारण दोघांना मारहाण; दोघांना अटक

0
210

विनाकारण दोघांनी एका तरुणाला मारहाण केली. त्यामुळे मारहाण झालेल्या तरुणाच्या भावाने मारहाण करणाऱ्यांना विचारणा केली. त्यावरून त्यांनी विचारणा करणाऱ्या भावाला देखील मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १९) रात्री साडे अकरा वाजता वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

यशराज विजय काळभोर (वय २५, रा. निगडी गावठाण), कुणाल प्रदीप दराडे (वय २४, रा. चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ऋषिकेश सुभाषराव डोंगरे (वय २७, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ गुरुद्वारा चौकाजवळ वाल्हेकरवाडी येथे फोनवर बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी काहीही कारण नसताना फिर्यादी यांच्या भावाला मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस देखील बेदम मारहाण करून जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.