विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

217

तळेगाव दाभाडे, दि. ४ (पीसीबी) – घरासमोर लघुशंका करणाऱ्यास रोखल्याने सहा जणांनी मिळून महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 3) सकाळी स्टेशन चौकाजवळ, तळेगाव दाभाडे येथे घडली.

उमाकांत किसनराव पवार (वय 66), चेतन उमाकांत पवार (वय 40), नितीन उमाकांत पवार (वय 37), तुषार उमाकांत पवार (वय 33, रा. तळेगाव दाभाडे), मेफुज, मामू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमाकांत याचा कामगार मेफुज हा फिर्यादी यांच्या घरासमोर लघुशंका करत होता. त्यामुळे फिर्यादींनी त्याला रोखले. त्यावरून आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ केली. लाकडी दांडके, रॉड, सिमेंट ब्लॉकने फिर्यादींच्या मुलाला मारहाण केली. तसेच फिर्यादी अश्लील शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.