विद्रोही लेखिका प्रियंका चौधरी यांच्या आजादी या पुस्तकाचे शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन

0
193

आळंदी,दि.०३(पीसीबी) – रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी आळंदी येथे भागवत वारकरी महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी लेखिका प्रियंका चौधरी यांच्या आजादी सुवर्ण इतिहास स्त्री क्रांतीचा या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला. या पुस्तका विषयी थोडक्यात आजादी ‘सुवर्ण ईतिहास स्त्री क्रांतीचा’ हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये इतिहासाने दखल न घेतलेल्या ७७ स्त्री क्रांतिकारकांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा घेणारे पुस्तक.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधे पुरुषांबरोबरच स्त्री क्रांतिकारकांनीही तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावली होती.परंतु दुर्दैवाने इतिहासाने त्यांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही.आपल्या संसाराची, घरादारांची, मुलाबाळांची व प्रसंगी प्राणांची देखील पर्वा न करता आपल्या देशाला परकियांच्या गुलामगिरीतून मुक्त करणासाठी ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकुन दिले.अशा ७७ विरांगणांचा इतिहास मांडला आहे. विरांगणांच्या देशभक्ती व बलीदानातुन आजच्या युवतींनी प्रेरणा घेऊन देशकार्यात स्वतःला झोकून द्यावे.आजच्या युवा पिढीने अंधश्रद्धा, कुप्रथा, पारंपारिक चौकटींमधे न अडकता स्वतःला अबला नव्हे तर सबला म्हणुन या सामाजिक परिघातून बाहेर पडण्याची गरज आहे, हाच या पुस्तकामागचा आहे.

हे पुस्तक ॲमेझॉन या सोशल साइटवर तसेच प्रत्यक्ष बाजारपेठेसुध्दा उपलब्ध करण्यात आले आहे.प्रियंका चौधरी या लेखिका विदर्भातून पुणे शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलेल्या २७ वर्षीय या युवतीने लोकसभागातून पुण्यासह राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये ७२ मुक्त वाचनालय सुरू केले आहेत. शाळेत असताना केवळ ग्रंथालया अभावी वाचनासाठी पुस्तके न मिळाल्याने या युवतीने स्वअनुभवातून आलेल्या अनुभवातून ही वाचन चळवळ सुरू केली आहे. या चळवळीला तिने मुक्त वाचनालय चळवळ ( ओपन लायब्ररी मुव्हमेंट) असे नाव दिले आहे यामुळे ग्रामीण भागात ही युवती ग्रंथालय कन्या ( लायब्ररी गर्ल) म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. प्रियंका रामराव चौधरी सध्या पुण्यात राहते ही मूळची यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील आहे. या पुस्तक प्रकाशनावेळी लेखिका प्रियंका चौधरी, माननीय शरद पवार,खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलास लांडे,दिनकर शास्त्री भुकेले, शामसुंदर महाराज सोन्नर, विकास लवांडे, अभिषेक अवचार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, वैभव जाधव यांच्यासह भागवत वारकरी सांप्रदायाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.