विचारणा केल्‍याने लाकडी दांडक्‍याने मारहाण

0
35
crime

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

माझा हरविलेला मोबाइल कोठे आहे, अशी विचारणा केल्‍याने तीन जणांनी मिळून एकास मारहाण केली. ही घटना महाळुंगे येथे रविवारी (दि. १) सायंकाळी घडली.

संजय कोरी व त्‍याचे तीन साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. सोमप्रकाश श्रीकृष्‍णधर तिवारी (वय ४०, रा. एच.पी.चौक, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव असून त्‍यांनी सोमवारी (दि. २) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी तिवारी यांचा मोबाइल फोन हरविला होता. त्‍याची तक्रार देण्‍यासाठी ते महाळुंगे पोलीस ठाण्‍यात आले होते. तेथून परत जाताना त्‍यांना वाटेत आरोपी संजय कोरी हा भेटला. त्‍यांनी कोरी याला माझा मोबाइल कोठे आहे, अशी विचारणा केली. त्‍यानंतर थोड्या वेळाने तो आपल्‍या इतर तीन साथीदारांना घेऊन आला. त्‍याने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत दुखापत केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.