वाहनाच्‍या धडकेत अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यू

0
40

दि ४ जुलै (पीसीबी ) – भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्‍यामुळे अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री पावणे बारा वाजताच्‍या सुमारास बालेवाडी येथे घडली.

सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर सखाराम उतेकर (वय 54) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी मध्‍यरात्री पावणे बारा वाजताच्‍या सुमारास अनोळखी व्‍यक्‍तीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.