वाहनांच्या जाळपोळ प्रकरणी गुन्हा दाखल

220

काळेवाडी, दि. ५ (पीसीबी) – वाहनांची जाळपोळ केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 2) पहाटे ही घटना नढेनगर काळेवाडी येथे घडली.

ओमप्रकाश जाधुराम यादव (वय 38, रा. नढे नगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या समोर वाहने पार्क केली होती. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास दोघेजण आले. आरोपींच्या हातात एक कॅन असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने हे आरोपी पेट्रोल चोरीच्या उद्देशाने आल्याचे पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान आरोपींनी एक कार, तीन दुचाकी जाळल्या. त्यात चारही वाहनांचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत कारची कागदपत्रे देखील जळाली आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत