हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावजत्रा
सव्वाशे वर्षांची समृद्ध परंपरा असलेली बगाड यात्रा
दि . १३ ( पीसीबी ) – हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर गावाच्या श्रद्धेचा, एकतेचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा होता वाल्हेकर वाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकात बगाडाचे रिंगण पार पडले यात सर्व ग्रामस्थ यांनी आपली लहान मुले गळकरी श्री धनंजय वाल्हेकर व शेलकरी श्री चांगदेव वाल्हेकर यांचे कडेवर देऊन
रिंगण फेरी मारून घेतली व मुलांच्या आरोग्यासाठी आशीर्वाद घेतले , या यात्रेमध्ये तरुणाईचा व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता , त्या वेळी बलाचे व आरोग्या चे प्रतिक असलेले हनुमानाचे दुत परिसरात आरोग्यावर काम करणार्या दहा व्यक्तींना रोटरी क्लब ॲाफ वाल्हेकरवाडी यांनी रामदुत या पुरस्काराने सन्मानित केले , तदनंतर
वाल्हेकरवाडी ते ग्राम दैवत श्री काळभैरवनाथ मंदिर चिंचवड येथे श्री संदिप पोपटराव वाल्हेकर यांच्या उत्कृष्ट देखन्या दोन बैलजोडीं च्या सह्यायाने व पारंपरिक वाद्य ढोल ताशांच्या गजरात संध्याकाळी ८ वाजता बगाड हे वेताळबुवा , हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन श्री काळभैरवनाथ मंदिर चिंचवड येथे पोहोचले
, या वर्षी चा गळकरी असण्याचा मान असलेल्या श्री धनंजय तान्हाजी वाल्हेकर यांच्या हस्ते सपत्निक काळभैरवनाथ व आई जोगेश्वरी मातेची आरती करुन भंडार खोबरे उधळुन बगाड यात्रा संपन्न झाली,
यात्रेत
सर्व जेष्ठ ग्रामस्थ तरुण वर्ग तसेच महिला आणि रोटरी क्लब ॲाफ वाल्हेकर वाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.