वारकरी आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात चालू असलेले षड्यंत्र हाणून पाडण्याचा हजारो वारकरी आणि कीर्तनकारांचा निर्धार !

0
35
आळंदी, दि. ३० (पीसीबी) : आळंदी देवाची येथे पार पडलेल्या ‘वारकरी संमेलना’त वारकरी आणि हिंदु धर्म व देवीदेवता यांच्या विरोधात चालू असलेले षड्यंत्र हाणून पाडण्याचा हजारो वारकरी आणि कीर्तनकारांचा निर्धार केला, तसेच प्रत्येक वारकर्‍यांनी ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र संपवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. आळंदी देवाची येथे प्रदक्षिणा मार्गावरील फ्रुटवाले धर्मशाळा येथे हे संमेलन पार पडले. या संमेलनाचे आयोजन ‘वारकरी संप्रदाय’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या वेळी वारकरी शिक्षण संस्थांना ग्रंथ आणि पुस्तक यांचे वाटप करण्यात आले. निवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री. प्रकाश लोंढे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा उद्देश सांगितला, तसेच त्यांच्या पुढाकाराने वारकरी संमेलन यशस्वी झाले.
 
या संमेलनाला ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराज, गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे महाराज, गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर कदम महाराज (छोटे माऊली), ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, ह.भ.प. दिगंबर महाराज नरावडे, ह.भ.प. नवल महाराज, ह.भ.प. नामदेव महाराज वाळके, ह.भ.प. संजय महाराज उंदरे, ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, ह.भ.प. संतोष आनंद महाराज, ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती, तर ह.भ.प. कीर्तनकार-प्रवचनकार महाराज, वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्य आणि ज्येष्ठ साधक विद्यार्थी, हिंदुप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
 
ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्व आणि हिंदु तत्त्वज्ञान यांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ता, संपत्ती आणि कीर्ती मिळवण्यासाठी अनेक ‘मंडळीं’नी स्वतःचे आयुष्य खर्ची घातले; मात्र हिंदु जनजागृती समिती याला अपवाद आहे. देशात पोलीस आाणि सरहद्दीवर सैनिक देशाचे संरक्षण करत आहेत, तर दुसरीकडे देशात हिंदु जनजागृती समिती निष्कामपणे हिंदु धर्माचा प्रसार करून हिंदु धर्मावरील आघात हाणून पाडण्याचे कार्य करत आहे. कुठेही विविध आघाडीवर हिंदु धर्मावर आघात होत असेल, तर लगेच तिकडे धावून जाऊन शीत युद्धाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने लढा देत आहे. हिंदु धर्माचे रक्षण करणे हेच हिंदूंचे कर्तव्य आहे. माहेरचे संस्कार जपून सासरी रहाणार्‍या सुनेला ‘आदर्श सून’ असे म्हणतात. त्याप्रमाणे हिंदूंनी हिंदु धर्माचे कार्य कृतीतून करून दाखवले पाहिजे.
 
या वेळी ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले की, आळंदी येथे घेतलल्या वारकरी संमेलनाला वारकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आता प्रत्येक ३ महिन्यांनी असे संमेलन आळंदी येथे झाले पाहिजे. परकीय आक्रमणे, जिहाद, धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असतांनाही वारकरी संप्रदायांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली. यापुढे आपणाला मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे, तेव्हाच पुढील काळात धर्म टिकणार आहे. मुसलमान आपल्या वारीत जरी आले, तरी ते त्यांचा पंथ घेऊन येतात. ते त्यांच्या धर्माच्या प्रचारासाठी आपल्यात येतात. आपले हिंदु आपली संस्कृती सोडून गोल टोप्या घालून बसतात. हिंदु स्वत:चा धर्म सोडतात आणि मुसलमान स्वत: धर्म सोडत नाहीत. अन्य धर्मियांच्या षड्यंत्रापासून हिंदूंनी सावध झाले पाहिजे.
 
हिंदु संघटक आणि प्रसिद्ध लेखक श्री. समीर दरेकर म्हणाले की, हिंदूंनी इस्लाम आणि त्यांचा धर्मग्रंथ समजून घेणे आवश्यक आहे. ते समजून घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की मुसलमान सर्वधर्मसमभाव का मानत नाहीत ? ख्रिश्चन लोक आता येशूचे अंभग काढत आहेत. येशूची प्रतिमा ठेवून श्रीसत्यनारायणाची पूजा केली जात आहे. हिंदु आणि वारकरी वेगळे असल्याचा अप्रचार विद्रोही मंडळी करत आहे. मुळात हे दोन्ही एकच आहेत. ख्रिस्ती लोक हिंदूंची नावे देऊन हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. परधर्मात गेलेल्या हिंदूंना आपल्या धर्मात आणणे हे वारकर्‍यांचे कर्तव्य आहे. या विरोधात वारकर्‍यांनी सतर्क राहून धर्मांतराला विरोध केला पाहिजे. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात वारकर्‍यांनी लढा देणे आवश्यक आहे.
 
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, अर्बन नक्षलवाद्यांची भयानक समस्या देशात आहे. काश्मीरमध्ये ३२ वर्षांपूर्वी हिंदूंच्या हत्या झाल्या; मात्र पुरोगामी, साम्यवादी मंडळींनी तोंड उघडले नाही. या संघटना अर्बन नक्षलवाद्यांना साहाय्य करत आहेत. देशात बिग्रेडी लोक, पुरोगामी, साम्यवादी यांनी हिंदु धर्म आणि हिंदु समाजाच्या विरोधात समाजात ‘नरेटिव्ह’ (खोटे कथानक) निर्माण करून सनातन धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले आहे. हा शहरी नक्षलवाद आता वारकर्‍यांच्या वारीतही घुसला आहे. या नक्षलवाद्यांकडून हिंदु धर्म वेगळा, वारकरी संप्रदाय वेगळा असा भेदभाव करून हिंदूंच्या मनात विष पेरले जात आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटित होऊन हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. हिंदूंच्या सर्व समस्या सोडवायच्या असतील, तर एकच पर्याय हिंदु राष्ट्राची स्थापना करणे होय !
 
रणरागिणी शाखेच्या कु. क्रांतीताई पेटकर म्हणाल्या की, हलाल अर्थव्यवस्थेत हिंदूंचा पैसा आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे देशाला घातक असलेल्या हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधातील जनआंदोलनात वारकर्‍यांनी सहभागी झाले पाहिजे