वानवडी परिसरातील वारकर मळा येथील ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा

0
53

पुण्यातील वानवडी परिसरात दिवसाढवळ्या एका सोन्याच्या दुकानावर 6 ते 7 जणांनी दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि.18) दुपारी बाराच्या सुमारास वानवडी येथील बी.जी.एस. ज्वेलर्स येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरी, जबरी चोरी, मारामारी, दरोड्याचे प्रमाण वाढत आहे.