वाट पहात थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण हिस्कावले

0
152

मुलाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिस्कावले. ही घटना सोमवारी (दि.20) पिंपरीतील वल्लभनगर बी आर टी एस बस स्टँड येथे घडली आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात 52 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यावरून दोन अनोळखी इसमावर गुन्हा दखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बस स्टँड मधून बाहेर येऊन त्यांच्या मुलाची वाट बघत असताना आरोपी हे दुचाकी वरून येवून फिर्यादी च्या गळ्यातील 75 हजार रुपयांचे मिनी गंठण हिसकावून नेले.