लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला

0
94

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचं नाव अध्यक्षपदासाठी मांडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधारी एनडीएच्या 13 घटक पक्षांनी देखील प्रस्ताव मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, जीतनराम मांझी, कुमारस्वामी, चिराग पासवान,सुनील तटकरे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी यांनी ओम बिर्ला यांच्या अर्जाला अनुमोदन दिलं.

के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. एन.के. प्रेमचंद्रन, पंकज चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिलं.