लेखक झुंजार सावंंत यांचे निधन

0
230

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड साहित्य-संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष झुंजार बाबुराव सावंत (वय-७३) यांचे मंगळवारी (दि.१२) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे. जागतिक महानुभव परिषदेचे ते उपाध्यक्ष होते.

पुणे शहर गौरव ग्रंथ लिखानात त्यांचा मोठा वाटा होता. महानुभव पंथाचा अभ्यास व संशोधनातही त्यांचे मोठे योगदान होते. पाऊलखुणा हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. विविध वर्तमानपत्र, मासिकांतूनही त्यांनी विपूल लेखन केले होते.