लिफ्टच्या बहाण्याने तरुणास लुटले

0
700

दिघी, दि. २४ (पीसीबी) – लिफ्ट मागून रस्त्यात गाडी थांबवण्यास सांगत एका तरुणाला लुटले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 21) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास दिघी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्याजवळ घडली.

अक्षय देवदत्त फाळके (वय 24, रा. दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अशोक पुनवासी जैसवाल (वय 30, रा. चऱ्होली गाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैसवाल हे शास्त्री चौकातून चऱ्होली गावाकडे दुचाकीवरून जात होते. गव्हाणे पेट्रोल पंपाजवळ त्यांना आरोपी अक्षय याने लिफ्ट मागितली. फिर्यादी यांनी लिफ्ट दिली असता रस्त्याने जाताना ओढ्याजवळ गेल्यानंतर अक्षय याने जैसवाल यांना लघुशंकेसाठी दुचाकी थांबवल्यास सांगितले. जैसवाल यांनी दुचाकी थांबवली असता अक्षयने त्यांना चाकूचा धाक दाखवले. जैसवाल यांच्या खिशातून तीन हजारांचा मोबाईल, 18 हजार रुपये रोख रक्कम आणि 15 हजारांची दुचाकी असा एकूण 36 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. दिघी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.