लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अनिल भांगडिया तर सचिवपदी बालाजी सुरवसे

86

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – लायन्स क्लब ऑफ़ पुणे आकुर्डीच्या अध्यक्षपदी अनिल भांगडीया तर सचिवपदी बालाजी सुरवसे यांची निवड करण्यात आली. तसेच लिओ क्लब आकुर्डीच्या अध्यक्षपदी हर्षित शर्मा तर सचिवपदी यश महाजन यांची निवड करण्यात आली.

थरमॅक्स चौकातील हॉटेल वी मध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थिततीत अनिल भांगडीया व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहण समारंभ पार पडला. ह्या सोहळ्यामध्ये नवीन ५८ सभासद जोडले असून पुढेही असेच नवीन सभासद वाढवत राहणार आहोत असे भांगडिया म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्किटेक्ट मनाली भांगडिया आणि नवनिर्वाचित अध्यक्ष यांची ओळख अपूर्वा भांगडिया यांनी करून दिली.

यावेळी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ दीपक शहा, माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल-१ परमानंद शर्मा, वसंत गुजर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, अर्बन स्पेस क्रिएटरचे डायरेक्टर मोहित डागा & आर्किटेक्ट स्वप्नील शेठ, पिंपरी चिंचवड प्लास्टिक अससोसिएशन चे अध्यक्ष नितीन गट्टाणी, वि हॉटेल चे डायरेक्टर संजय ढेंबरे आणि नामदेव पोटे, पिंपरी चिंचवड फेडरेशन चे अध्यक्ष गोविंद पानसरे, मावळते अध्यक्ष विक्रम माने, मावळते सचिव अक्षय शहरकर , माजी खजिनदार अर्चना कोळी, लिओ क्लबचे माजी अध्यक्ष श्वेता माने, खजिनदार दर्शिता सुरवसे, तसेच सामाजिक, कला, क्रीडा, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्तिथीत हा सोहळा पार पडला.

क्लबची यावर्षीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अनिल भांगडीया( अध्यक्ष),बालाजी सुरवसे( सचिव),विठ्ठल झोडगे( खजिनदार), विक्रम माने(माजी अध्यक्ष), ओमप्रकाश पेठे( सल्लागार), राजेश शर्मा( प्रशासक), अर्बन स्पेस क्रियेटर चे डायरेक्टर मोहित डागा, आणि स्वप्नील शेठ, विजय सहारे, बाबूराव सागावकर( उपाध्यक्ष),मंगला गवई( सह सचिव),स्वाती माने( सह खजिनदार),वसंत गुजर( जीएमटी),हिरामण गवई( जीएलटी),श्रध्दा पेठे( जीएसटी),व्ही के शर्मा( जीएटी),राजेंद्र कोळी( प्रसिद्धी प्रमुख), मेघना महाजन( टेल ट्विस्टर),वंदना भांगडीया( टेमर), पिंपरी अमृत सावंत,दिलीप पाटील,अर्चना कोळी,मोहन पाटील,प्रदीप नागणे,अक्षय शहरकर,सत्येन भास्कर,अनिल दांदडे, प्रवीण महाजन( सर्व संचालक) लिओ क्लबची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- हर्षित शर्मा( अध्यक्ष),यश महाजन(सचिव), दर्शिता सुरवसे( खजिनदार).
लायन्स क्लब इंटरनॅशनल ला १०५ वर्षे पूर्ण झाले असून २१० देशामध्ये कार्यरत आहे आणि सभासद संख्या १४९८००० च्या वर आहे.

अध्यक्ष अनिल भांगडिया भविष्यातील उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाले कि, लायन्स क्लब आकुर्डी आणि अर्बन स्पेस क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने फिनोलेक्स चौक पिंपरी आणि रावेत येथील मुकाई चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे.

डॉक्टर दिनानिमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशनला भरीव आर्थिक मदत केली.”सर्व्ह विथ इंपॅक्ट” या उक्तीप्रमाणे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सायकल बॅंक,सोसायट्यामधील इ कचरा गोळा करणे,जल पुनर्भरण प्रकल्प,मनपा उद्यानांमध्ये देशी वृक्ष लागवड करणे,शाळेसाठी रोबोटिक्स लॅब,सौर ऊर्जा,कर्करोग नेत्रदान जनजागृती करणे, सामूहिक विवाह सोहळा घेणे,नदी स्वच्छता मोहीम,कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णवाहिका तसेच स्वर्गरथ लोकार्पण हे उपक्रम राबवण्यात येणार आहे.क्लबला मागील वर्षी उत्कृष्ट क्लब आणि इतर १७ पुरस्कार प्राप्त झाले तसेच चालू वर्ष्यात अधिकाधिक पुरस्कार प्राप्तीचे धेय्य अनिल भांगडिया यांचे आहे.. समाजातील दानशूर व्यक्ती तसेच समाजकार्याची आवड असलेले सदस्य सदरील लायन्स क्लब च्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छित असतील त्यांनी अनिल भांगडिया आणि बालाजी सुरवसे यांना ९८२२३१००५५ / ८६००९९४११६ संपर्क करावा असे आवाहन अनिल भांगडिया यांना केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी मॅडम आणि नेहा मुंदडा यांनी केले.