लग्न मांडवातून एक लाख रुपयांचा ऐवज चोरीला

89

चंद्रपूर, दि. २८ (पीसीबी) : वडमुखवाडी येथील एका लॉन्स वरून लग्न घाईत चोराने एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हि घटना शनिवारी (दि.24) रात्री वडमुखवाडी येथील चंद्रपूर लॉन्स येथे घडली.

या प्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी 30 ते 35 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर लॉन्स येथे वर पक्षाच्या रूममध्ये फिर्यादी यांची पर्स होती. या पर्समध्ये पंचावन्न हजार रुपयांचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 70 हजार रुपये रोख असा 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज होता. चोराने गर्दीचा फायदा घेत रूममध्ये जाऊन फिर्यादी यांची पर्स चोरून नेली,या प्रकरणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.