लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना

0
363

देहूरोड, दि. १५ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 14) निगडी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

निगडी पोलीस ठाण्यात 28 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नीरजकुमार बिजलेश शुक्ला (वय 25, रा. वडगाव शेरी, पुणे. मूळ रा. फतेपूर, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने फिर्यादी महिलेसोबत लग्न करणार असल्याचे तिला आमिष दाखवले. त्यातून तिच्याशी जवळीक साधत निगडी येथील लॉजवर नेऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर महिलेशी लग्न केले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 16 जानेवारी ते 4 जुलै या कालावधीत घडला.

देहूरोड पोलीस ठाण्यात 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित विश्वास पाटील (रा. देहूगाव. मूळ रा. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छे विरोधात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सन ऑगस्ट 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत देहूगाव आणि तळोजा एमआयडीसी पनवेल येथे घडला.