लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

138

सांगवी, दि. १७ (पीसीबी) – लग्नाच्या आमिषाने महिलेवर वारंवार बलात्कार केला. हा प्रकार 13 फेब्रुवारी ते ऑगस्ट 2021 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.

प्रदीप केशव गित्ते (रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. 16) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची पूर्वी चांगली मैत्री होती. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून त्यांना जुनी सांगवी येथील रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केला. दरम्यान आरोपीने फिर्यादींना दुसऱ्या कोणासोबतही लग्न करू दिले नाही. काही महिने फिर्यादींनी आरोपीची वाट पाहिली, मात्र तो लग्न करत नसल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.