रिक्षा चालकाला बेदम मारहाण; चौघांना अटक

0
134

आमचा भाऊ मेला आता तुझा भाऊ मारणार असे म्हणत चार जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. १९) सायंकाळी ओटास्कीम, निगडी येथे घडली.

शंकर भालेराव (वय २४), बबल्या रणदिवे, विशाल पायळ, विशाल पाटोळे (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अरबाज हुसेन तलफदार (वय २४, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरबाज हे रिक्षा चालक आहेत. ते रविवारी रात्री घराच्या पार्किंग मधून रिक्षा काढण्यासाठी गेले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी ‘तू रियाज कोरबूचा माणूस आहे. त्याचा स्टेटस कशाला ठेवतो. आमचा भाऊ मेला तुझा भाऊ मारणार’ असे म्हणत फिर्यादीस लाकडी बांबू आणि कोयत्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.