राहुल कलाटे, केळव घोळवे, सचिन भोसले, सचिन चिखले यांना आरक्षणाचा फटका

264

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 37 आणि सर्वसाधारण महिलांच्या 38 जागांसाठी आज (शुक्रवारी) आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र जगताप, सुवर्णा बुर्डे, मयूर कलाटे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, यशोदा बोईनवाड, शशिकांत कदम, जगदिश शेट्टी, शीतल शिंदे, अश्विनी बोबडे, केशव घोळवे, सचिन भोसले, प्रसाद शेट्टी यांचा पत्ता गूल झाल्यात जमा आहे. अनेक बड्या माजी नगरसेवकांच्या जागेवर महिला आरक्षण पडल्याने त्यांचे राजकिय भवितव्य अंधारात आले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर योगेश बहल यांना हक्काचा संत तुकारामनगरचा प्रभाग सोडून कासारवाडी प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 46 प्रभाग आहेत. तर, नगरसेवक संख्या 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) 11 पुरुष 11 महिला अशा 22, अनुसूचित जमाती (एसटी) 2 महिला 1 पुरुष अशा 3, ओबीसींसाठी 19 महिला 18 पुरुष अशा 37 जागा आहेत. तर खुल्या गटासाठी 38 महिला 39 पुरुष अशा 77 जागा आहेत.

एससी, एसटीचे आरक्षण कायम
एससी, एसटीचे आरक्षण कायम राहणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात 19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14 या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी 44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 एसटी समाजातील पुरुषासाठी राखीव झालेला आहे.

असे आहे प्रभागानुसार आरक्षण
प्रभाग क्रमांक 1 – तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 2 – चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी (एससी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 3 – बो-हाडेवाडी, जाधववाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 4 – मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 5 – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 6 – दिघी, गणेशनगर, बोपखेल( एसटी पुरुष,सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 7 – सॅंण्डविक कॉलनी, रामनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 8 – भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 9 – धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 10 – इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 11 – गवळीमाथा, बालाजीनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 12 – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 13 – मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 14 – यमुनानगर, फुलेनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक 15 – संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 16 – नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर ( एससी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 17 – वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर( एससी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक 18 – मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 19 – चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक 20 – काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर (एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक 21 – आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडी (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 22 – ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर (एससी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक 23 – वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहत (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत (एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती (एससी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 26 – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 27 – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह ( ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 28 – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 29 – भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल (एससी पुरुष,सर्वसाधारण महिला,
सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 30 – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 31 – काळेवाडी, विजयनगर, नढेनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 32 – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर ( एससी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर ( ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी ( एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 36 – गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल ( ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडक ( एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती (एससी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक 39 – पिंपळे निलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर (एससी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती (एससी महिला, एसटी महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 42 – कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 43 – दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर ( एससी महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क (एससी पुरुष, एसटी महिला, सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक 45 – नवी सांगवी, कीर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर (ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक 46 – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर (एससी पुरुष, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण