राहुल कलाटेंच्या प्रचारार्थ खासदार डॉ. अमोलकोल्हेंची बाईक रॅली

0
41

डॉ. कोल्हे पुन्हा चिंचवडला

चिंचवड, ता. ९ : विधानसभेतील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ संसदरत्न, खासदार डॉ. अमोल कोल्हे रविवारी (ता. १०) भव्यसांगवी-नवी सांगवी,पिंपळेगुरव,पिंपळेसौदागरया भागातून बाईक रॅली काढणार आहेत. या रॅलीत चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
सकाळी दहा वाजता नवी सांगवीतील साई चौकापासून ह्या बाईक रॅलीचा शुभारंभ होणार आहे. त्यांनंतर पाण्याची टाकी, बँक ऑफ महाराष्ट्र, शितोळे चौक गणपती मंदिर, बाळासाहेब शितोळे मार्केट, मेन रस्ता मंदिर शिवाजी चेंबर्स, पवार नगर चौक गार्डन, अभिनव नगर, गजानन महाराज मुळा नगर, एकता आयप्पा मंदिर, पवना नगर, ममता नगर, सेवा हॉस्पिटल, जुनी सांगवी बस स्टॉप, ढोरे भवन माकन हॉस्पिटल समोरुन माहेश्वरी चौक, साई चौक, फेमस चौक, क्रांती चौक, कृष्ण चौक, काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, पूजा हॉस्पिटल, शिवाजी चौक पी.सी.एम.सी बस स्टॉप श्रुष्टी चौक – डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महालक्ष्मी कार्यालय, जवळकर नगर, काशीद पार्क, स्वराज गार्डन चौक, काटे पेट्रोल पंप, काटे वस्ती, शिवार चौक, कोकणे चौक, पी.के चौक, महादेव मंदिर यामार्गे ही रॅली निघणार असून रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता होईल