राष्ट्रवादी काँग्रेसकडन शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन

0
53

पिंपरी, दि.८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पालक मंत्री पुणे जिल्हा मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार शासन आपल्या दारी हा उपक्रम चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) व पिंपरी चिंचवड अप्पर तहसिल कार्यालय व पुणे, मुळशी तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम दि.१० जून, १४ जून, १८ जून,१९ जून, २४ जून २०२४ दरम्यान चिंचवड विधानसभेतील विविध भागात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका मा.नगरसेविका माया बारणे, कार्याध्यक्ष तथा मा.नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे, मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक कैलास बारणे, महारष्ट्र प्रदेश ओबीसी निरीक्षक ॲड.सचिन औटे, ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे व दीपक साकोरे उपस्थित होते.