रावेत गावठाणातील गणपती मंदिरातून दानपेटी चोरीला

41

रावेत, दि. १७ (पीसीबी) – रावेत गावठाण येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री साडेअकरा ते मंगळवारी (दि. 16) पहाटे साडेचार वाजताच्या कालावधीत घडली.

धर्मराज मारुती शिंदे (वय 59, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने रावेत गावठाण येथील सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. मंदिरातून स्टीलची दानपेटी चोरून नेली. त्यामध्ये 50 ते 60 हजार रुपये जमा झाले होते. रावेत पोलीस तपास करीत आहेत.