रावण आणि राम यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी एकास अटक

0
318

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – रावण आणि राम यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी एका व्यक्तीला चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (दि. 7) सकाळी घडली.

राहुल विठ्ठल वाघमारे (वय 55, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी धनंजय गावडे (वय 35, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी सकाळी फिर्यादी गावडे हे त्यांच्या मोबाईलवर पाहत होते. राहुल वाघमारे याने दोन स्टेटस ठेवले होते. एका स्टेटस मध्ये रावण आणि दुसऱ्या स्टेटस मध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्याबाबत मजकूर होता. हा मजकूर आक्षेपार्ह असून राहुल वाघमारे याने हेतूपुरस्सर स्टेटस ठेवून धार्मिक भावना दुखावल्याचे गावडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी तात्काळ वाघमारे यास अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.