राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण..

35

पीसीबी ,दि.22 – सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्ननिर्माण झाले आहेत.