रस्त्यावर कार पार्क केल्याने एकास बेदम मारहाण; दोघांना अटक

0
85

रस्त्यावर कार पार्क केल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 10 मे रोजी बालाजीनगर भोसरी येथे घडली.

अजय उर्फ सोन्या फिरोज रणदिवे (वय 25, रा. बालाजीनगर, भोसरी), सचिन दीपक गायकवाड (वय 24, रा. बालाजीनगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अजय बाबासाहेब धोत्रे (वय 24) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाबासाहेब काळूराम जाधव (वय 30, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी त्यांची कार बालाजीनगर भोसरी येथे एका मोबाईल शॉप समोर पार्क केली. त्यावरून आरोपींनी आपसात संगनमत करून जाधव यांना लोखंडी रॉड, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात जाधव यांच्या खांद्यावर, दंडावर, डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.