रस्त्यात अडवून कंत्राटदाराला लुटले

0
96

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली फाटा येथे पहाटेच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या कंत्राटदाराला अडवून तिघांनी लुटले. ही घटना बुधवारी (दि. 12) पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली.

संदीप किसनराव कराड (वय 29, रा. चऱ्होली फाटा, ता. हवेली. मूळ रा. इंजेगाव, ता. परळी, बीड) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कराड हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना रस्त्यात अडवले. शिवीगाळ दमदाटी करत त्यांच्या अंगावर धावून येत त्यांना दगड फेकून मारला. फिर्यादींनी तो दगड चुकवला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीला दगड मारून नुकसान केले. शिवीगाळ, आरडाओरडा करत दहशत माजवत फिर्यादी यांच्या खिशातून 500 रुपये व सोन्याची साखळी असा एकूण 40 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून घेतला. त्यानंतर आरोपींनी कारने फिर्यादी यांचा पाठलाग केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.