रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार चोरीला

0
249

देहूरोड, दि. २० (पीसीबी) : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी मेहता पार्क एम 1 या सोसायटी समोर देहूरोड येथे घडली.

अमित अशोक खेर (वय 44, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खेर यांनी त्यांची 10 लाख रुपये किमतीची कार (एमएच 14/जेयु 2720) सोसायटी समोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी त्यांची कार चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.