रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली सुमो गाडी चोरीला ; चोरट्याला अटक

0
415

भोसरी, दि.२४ (पीसीबी) – आळंदी रस्त्यावर गजानन महाराज मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली सुमो गाडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.

संजीवन बबन गुरव (वय 38, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश श्रीरंग कांबळे (वय 22, रा. कर्नाटक) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची सुमो गाडी (एमएच 14/सीएक्स 0737) भोसरी-आळंदी रस्त्यावर गजानन महाराज मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. बुधवारी रात्री साडेनऊ ते गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांची सुमो गाडी चोरून नेली. पोलिसांनी चोरट्याच्या शोध घेत त्याला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.