रस्ता ओलांडत असताना ज्येष्ठ नागरिकाचा अपघाती मृत्यू

228

कासारवाडी, दि. २३ (पीसीबी) – दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 16 ऑक्टोबर 2023 रोजी कासारवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि.22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून एमएच 14 जी.बी.6069 या दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात दिगंबर वामन भालेकर (वय 77) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती दिगंबर भालेकर हे पायी रस्ता ओलांडत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एकजण भरधाव वेगात आला व त्याने त्याच्या ताब्यातील गाडीने भालेकर यांना जोरदार धडक दिली. यात भालेकर गंभीर जखमी झाले व यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.