रस्टन कॉलनी मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला आग

0
35

निगडी, दि. ०१ (पीसीबी) : निगडी प्राधिकरण परिसरातील रस्टन कॉलनी मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 1) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास रस्टन कॉलनी मधील सेक्टर नंबर 27 अ येथे घरासमोर पार्क केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली. याबाबत कमलेश शिनकर यांनी अग्निशामक विभागाला माहिती दिली.

प्राधिकरण उप अग्निशामक विभागातील अधिकारी गौतम इंगवले, प्रमुख अग्निशामक विमोचक प्रतीक कांबळे, फायरमन संभाजी अवतारे, वाहन चालक संजय चिंधे, ट्रेनि फायरमन सुमित फरांदे, प्रणय सकुंडे, वैभव सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कूटरवर पाणी मारून आग विझवण्यात आली. यामध्ये स्कूटर (एमएच 14/एलके 0109) जळून खाक झाली.