मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

0
188

पुणे, दि.९ (पीसीबी) – मौजमजेसाठी चोरी करुन मोबाईल व चैन चोरणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मंगळसूत्र आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. लोकेश दयानंद कांबळे (वय 18, रा. मोरेवस्ती, साने चौक, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल संतोष निकाळजे (वय 22, रा. बोडकेवाडी, माण ता. मुळशी) यांनी 24 जानेवारी रोजी दुपारी पांडवनगर हिंजवडी येथून पायी जात असताना तीन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन निकाळजे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला.

या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान 35 सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे तांत्रीक विश्लेषण करत आरोपीची ओळख पटविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या माहितीनुसार लोकेश कांबळे याला भूमकर चौकातून हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

त्याने हा गुन्हा त्याच्या दोन साथीदारांसह मिळून केला असल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी एक मंगळसूत्र आणि तीन मोबाईल फोन असा एकूण 59 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाई मुळे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.