मोहितेवाडी येथील गॅस टँकर स्फोट प्रकरणी तिघांना अटक

0
76

दि २० मे (पीसीबी ) – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण-शिक्रापूर रोडवर मोहितेवाडी येथे टँकर मधून चोरून धोकादायकपणे गॅस काढणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. धोकादायकपणे गॅस काढून घेत असताना टँकरचा स्फोट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. १९) पहाटे घडली.

चैतन्य गणपत मोहिते (वय 50 रा. मोहितेवडी) सुरेश रूपाने (राजस्थान) व सुदर्शन कन्होरकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबर त्यांच्या साथीदार सोमनाथ पोतले, मुस्ताक कमलूउद्दीन यांच्यावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मोहितेवाडी येथील चाकण शिक्रापूर रोडवरील गुरुकृपा ढाब्या समोर थांबलेल्या गॅसच्या टँकर मधून बेकायदेशीरपणे गॅस चोरी करून तो गॅस टाकीमध्ये भरत होते. यावेळी गॅस टँकरचा स्फोट होण्याची भीती असताना देखील आरोपी कोणत्याही सुरक्षितते शिवाय गॅस चोरी करत होते. दरम्यान टँकरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली.

जागा मालकाला ही बाब माहिती असताना देखील पैशाच्या अमिषामुळे तो त्यांना जागा उपलब्ध करून देत होता.याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.