मोशी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

0
512

मोशी, दि. ७ (पीसीबी) – डोक्यात दगड घालून २४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.५) मोशी येथील मोकळ्या मैदानात घडली.

याप्रकरणी रंगनाथ गोविंद पवार (वय ४८ रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अमोल रंगनाथ पवार (वय २४) याचा अज्ञात इसमांने डोक्यात दगड घालून खून केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र अद्याप खूनाचे कारण कळू शकलेले नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.