मोरवाडीत मोठी आग, धुराचेे लोळ, प्रचंड मोठे स्फोट

0
618

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या जुन्या इमारती मागील अमृतेश्वर सोसायटी जवळ प्रचंड मोठी आग लागली आहे. रबर, प्लॅस्टिक, भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटले आहेत. चोरीचे टायर, केबलचा बेकायदा साठा या ठिकाणी असून त्याला आग लागली आहे. ऑईल भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोट होत असून अवकाळ धुराने काळवंडले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भितीची वातावरण आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे बंब आले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. बेकयदा प्लॅस्टिक, भंगार साठ्याला आग लागली आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून धुराचे लोट आकाशात उडत आहेत. दरम्यान या धुरामुळे अमृतेश्वर कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजमेरा कॉलनी तसेच मोरवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.