मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच केले मैत्रिणीवर कोयत्याने वार

41

काळेवाडी, दि. ७ (पीसीबी) – मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच घरात घूसुन मैत्रिणीवर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना काळेवाडी येथे सोमवारी (दि.५) दुपारी घडली.

याप्रकरणी तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून वाकड पोलिसांनी अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३० रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मावस बहिणीच्या घरी असताना आरोपी घरात घुसला यावेळी फिर्यादी फोनवर बोलत होत्या यावेळी आरोपीने कोणाशी बोलत आहेस म्हणून फोन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीने फोन देण्यास नकार दिला. याचा राग येवून आरोपीने त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार केले तसेच त्यांची बहिण सोडविण्यास आली असता तिच्याही गालावर कोयत्याने वार करत जखमी केले. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.