मोबाईल घेतल्याच्या संशयातून तरुणाला लोखंडी रॉड ने मारहाण दोघांना अटक

0
100

मोबाईल घेतल्याच्या संशयातून चार ते पाच जणांनी एका तरुणाला लोखंडे रॉड ने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.29) आळंदी फाटा येथे घडली आहे.

या प्रकरणे चाकण पोलीस ठाण्यात विजयकुमार राजेश कुमार (व 19 रा चाकण ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी विनोद गोपीनाथ कुटे (वय 25 रा.मेदनकरवडी) व पृथ्वीराज संतोष राठोड (वय 22 रा.. खराबवाडी) यांना अटक केली आहे. तर अजय अशोक चव्हाण रोहित राठोड व त्यांचा साथीदार जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा चुलत भाऊ हे फिर्यादीच्या मेहुण्याची वाट पाहत आळंदी फाटा येथे थांबले होते. यावेळी आरोपी आले व त्यांना या दोघांनी मोबाईल घेऊन कुठेतरी लपवला असावा असा संशय आला. यावरून त्यांनी कोणतीही विचारपूस न करता फिर्यादी यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने जीवघेणी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी व त्यांच्या चुलत भावाच्या डोक्याला तसेच हाताला गंभीर दुखापत झाली आहे.चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.